Today बुधवार, 22nd एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चौथीच्या मुलीने टिफिन उघडला आणि ती कोसळली… तासाभरात हृदयविकाराचे दोन धक्के, रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू

चौथीच्या मुलीने टिफिन उघडला आणि ती कोसळली… तासाभरात हृदयविकाराचे दोन धक्के, रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू

जयपूर: राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील एका शाळेत चौथीच्या विद्यार्थिनीने वर्गात दुपारी जेवणाचा डबा उघडला आणि ती जागीच कोसळली. शिक्षकांनी धावपळ करून तिला रुग्णालयात हलवले, पण तिचा आधीच मृत्यू झाला होता. या मुलीला तासाभरातच हृदयविकाराचे दोन धक्के बसले होते, असे डॉक्टरांनी सांगितले.

प्राची कुमावत (९) असे या मुलीचे नाव आहे. तिला आधी या प्रकारचा त्रास कधी झाला नव्हता. त्यामुळे कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिकर जिल्ह्यातील दांता येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत ही मुलगी शिकत होती. या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या मुलीने वर्गात असताना जेवणाचा डबा उघडला आणि ती जागीच कोसळली. याप्रकारे याप्रकारे मुलांना मूर्च्छा येण्याचे प्रकार नवे नाहीत. पण थोडेसे पाणी दिले की अशी मुले सावध होतात.

शिक्षकांनी आधी या मुलीला नजीकच्या दांता कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेले. तेथे या मुलीला थोडे बरे वाटू लागले. नंतर तेथील डॉक्टरांनी तिला रुग्णवाहिकेतून सिकरमधील सरकारी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात तिला पुन्हा हृदयविकाराचा धक्का बसला. सिकरमधील सरकारी रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच तिचा मृत्यू झाला. दांता सीएचसीचे डॉ. रा. के. जांगीड यांनी सांगितले की, या मुलीवर आम्ही ऑक्सिजनसह कार्डियाक रेस्सायटेशनचे उपचार केले होते. प्राथमिक अंदाजानुसार, तिला हृदयविकाराचे धक्के बसले असावेत. या मुलीचे वडील खासगी नोकरी करतात, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!