Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ISRO Mission Failed: भारताला मोठा झटका! तांत्रिक बिघाडामुळे PSLV-C62 मोहीम अयशस्वी

ISRO Mission Failed: भारताला मोठा झटका! तांत्रिक बिघाडामुळे PSLV-C62 मोहीम अयशस्वी

ISRO Mission Failed: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) 2026 या वर्षातील पहिल्याच महत्त्वाकांक्षी मोहिमेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सोमवारी, 12 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी 10:17 वाजता प्रक्षेपित करण्यात आलेली PSLV C62/EOS-N1 (अन्वेषा) मोहीम तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या क्षणी आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरली. या मोहिमेद्वारे भारताचा प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-N1 आणि इतर 14 परदेशी व देशांतर्गत पेलोड्स अवकाशात सोडले जाणार होते.

तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम प्रक्रियेत तांत्रिक बिघाड

सकाळी प्रक्षेपणासाठी सर्व तांत्रिक निकष (Parameters) योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्वयंचलित क्रम जारी करण्यात आला आणि 10:18:30 वाजता रॉकेटने अवकाशात झेप घेतली. सुरुवातीचे टप्पे यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाला आणि ही मोहीम अपयशी ठरली. विशेष म्हणजे, 2025 मधील एका अपयशानंतर PSLV साठी हे महत्त्वाचे पुनरागमन मानले जात होते, परंतु या तांत्रिक अडथळ्यामुळे इस्रोच्या प्रयत्नांना यश आले नाही.

EOS-N1 ‘अन्वेषा’चे महत्त्व

या मोहिमेतील मुख्य उपग्रह DRDO चा EOS-N1 (अन्वेषा) हा हायपरस्पेक्ट्रल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह होता. सीमा भागातील देखरेख करणे, शत्रूची लपलेली लक्ष्ये शोधणे आणि पर्यावरणीय बदलांवर लक्ष ठेवणे या कामात हा उपग्रह क्रांती घडवेल, अशी अपेक्षा होती. यासोबतच इस्रोची व्यावसायिक शाखा ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (NSIL) द्वारे इतर 14 सह-प्रवासी उपग्रह देखील पाठवण्यात आले होते. या मोहिमेच्या अपयशामुळे संरक्षण आणि संशोधन क्षेत्रातील या महत्त्वाच्या डेटा मिळवण्याच्या प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!