Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; ‘या’ चेहऱ्याला संधी?

मोठी बातमी! प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; ‘या’ चेहऱ्याला संधी?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला आज बर्‍याच काळानंतर नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हे पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मार्गावर असून, आज दुपारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ते अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पक्षाने 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार आज दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान नामांकन अर्ज दाखल, 4 ते 5 वाजेदरम्यान अर्जांची छाननी, तर सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत माघार घेण्याची वेळ देण्यात आली आहे. जर एकमेव उमेदवार म्हणून नितीन नबीन यांचेच नामांकन वैध ठरले, तर त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाणार आहे. अन्य उमेदवार असल्यास 20 जानेवारीला मतदान होईल.

या प्रक्रियेसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य संघटनांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 14 डिसेंबर 2025 रोजी नितीन नबीन यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध

जुलै 2025 : हेमंत खंडेलवाल – मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष
डिसेंबर 2025 : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि सात वेळा खासदार राहिलेले पंकज चौधरी – उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष
जानेवारी 2026 : आदित्य साहू – झारखंड भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा निवडला जातो?

भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय परिषदेद्वारे निवडला जातो. या परिषदेत सुमारे 5,708 सदस्य असून, त्यात राष्ट्रीय परिषद सदस्यांसह देशातील 30 हून अधिक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे राज्य परिषद सदस्य सहभागी असतात. मात्र, एकच वैध नामांकन असल्यास मतदानाची गरज भासत नाही.

कोण आहेत नितीन नबीन?

सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास व आवास विभाग ही महत्त्वाची खाती आहेत. ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून 2010 पासून सलग निवडून येत आहेत. याआधी त्यांनी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

2006 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केलेल्या नबीन यांनी संघटनात्मक पातळीवर भक्कम काम केले आहे. 2016 ते 2019 या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनेत वेगळी ओळख निर्माण केली. 2021 मध्ये नितीश कुमार सरकारमध्ये त्यांना प्रथमच मंत्रीपद मिळाले.

घराणेशाहीचा वारसा, पण स्वतंत्र ओळख

नितीन नबीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे आमदार होते. मात्र, संघटनात्मक मेहनतीच्या जोरावर नबीन यांनी पक्षात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय मानले जात असून, मोदींनी त्यांचे वर्णन “कर्मठ आणि मेहनती कार्यकर्ता” असे केले आहे.

1980 मध्ये रांची येथे जन्मलेले नितीन नबीन शिक्षणाने मॅट्रिक आणि इंटरपर्यंत शिक्षित असून, निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून नमूद केले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!