Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nanded Pune Train : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढ! आता पुणे जंक्शनऐवजी आता हडपसरलाच उतरवावं लागणार

Nanded Pune Train : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढ! आता पुणे जंक्शनऐवजी आता हडपसरलाच उतरवावं लागणार

Nanded Pune Train : मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक क्लेशदायक बातमी दिली आहे. आगामी २६ जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेस आणि लातूर (हरंगुळ) स्पेशल ट्रेन या गाड्या पुणे जंक्शनपर्यंत न येता हडपसर स्थानकावरच थांबवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकावरील विकासकामांचे कारण पुढे करत प्रशासनाने हा निर्णय घेतला असला, तरी यामुळे प्रवाशांच्या पदरी मात्र प्रचंड हाल येणार आहेत.

पहाटेच्या वेळी प्रवाशांची मोठी अडचण

नांदेड-पुणे एक्स्प्रेस पहाटे ४:३० वाजता हडपसरला पोहोचते. इतक्या पहाटे हडपसरहून शहराच्या इतर भागात (उदा. स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड) जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा PMPML बसेस उपलब्ध नसतात. याचाच गैरफायदा घेत खासगी रिक्षा आणि टॅक्सी चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करून त्यांची आर्थिक लूट करण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या बदलाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

‘मराठवाड्याच्या गाड्यांनाच सावत्र वागणूक का?’

या निर्णयामुळे प्रवाशांसह रेल्वे संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “उत्तर भारत आणि गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांना पुणे जंक्शनवर प्रवेश मिळतो, मग केवळ मराठवाड्याच्या गाड्यांनाच हडपसरला का रोखले जाते?” असा संतप्त सवाल प्रवासी संघटनांकडून विचारला जात आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन गाड्या पुन्हा मुख्य स्टेशनपर्यंत सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हडपसर टर्मिनसचा हा वाद नवा नाही. यापूर्वी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यकाळातही हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, प्रवाशांचा प्रचंड रोष पाहता तो निर्णय मागे घेत गाड्या पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या पुणे स्टेशनवर सुरू असलेल्या कामांमुळे हा तांत्रिक बदल केल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी जेजुरीपासून ते हरंगुळपर्यंतच्या प्रवाशांना थेट पुणे जंक्शनपर्यंतच सुविधा मिळावी, ही मागणी आता जोर धरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!