GST tax Change : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी करातील बदलांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंवरील करात वाढ झाली आहे. 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करून आता फक्त 5 आणि 18 टक्के स्लॅब लागू राहणार आहेत.
यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, औषधे, शैक्षणिक साहित्य, टीव्ही, एसी, कार, बाइक यांच्या किंमती कमी होणार असून, सिगारेट, तंबाखू, लक्झरी गाड्या आणि जुगारासारख्या गोष्टींवर 40 टक्के कर लागू होणार आहे. सोमवार, 22 सप्टेंबर 2025 पासून हे नवे नियम लागू झाले आहेत.
करमुक्त (0% GST) वस्तू आणि सेवा खाद्यपदार्थ
- प्रोसेस्ड UHT दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी-टू-ईट चपाती, पराठा.
- शैक्षणिक साहित्य: पेन्सिल, वह्या, चार्ट, प्रयोगशाळा वह्या.
- आरोग्य क्षेत्र: 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा.
5% GST लागू असणाऱ्या वस्तू खाद्यपदार्थ
- वनस्पती तेल, तूप, बटर, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी.
- वैयक्तिक वापर: शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम.
- घरगुती वस्तू: किचन साहित्य, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्ती, शिलाई मशीन, नॅपकिन, डायपर्स, हँडबॅग, फर्निचर.
- कृषी साहित्य: ट्रॅक्टर, सिंचन उपकरणे, ठिंबक सिंचन साहित्य, पंप.
- वैद्यकीय साहित्य: थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर हातमोजे.
- हस्तकला: नक्षीकाम केलेले कागद, पेंटिंग्ज, वीटा, टाईल्स.
18% GST लागू असणाऱ्या वस्तू आणि सेवा इलेक्ट्रॉनिक्स
- एसी, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर.
- वाहने: लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने.
- कृषी उपकरणे: ट्रॅक्टरसाठी हायड्रोलिक इंधन, इंधन पंप.
- सेवा क्षेत्र: हॉटेल (दिवसाला 7500 रुपयांपेक्षा कमी खर्चाची), चित्रपटगृह (100 रुपयांपेक्षा कमी तिकीट), ब्युटी पार्लर.
काय स्वस्त झालं?
- खाद्यतेल, पीठ, तूप, साखर, पास्ता, बिस्कीट.
- नोटबुक, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य.
- साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, किचन साहित्य.
- औषधे, आरोग्य विमा, जीवन विमा.
- टीव्ही, एसी, लहान कार, बाइक, ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे.
काय महागलं?
चैनीच्या वस्तू: 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी, मोठ्या SUV, लक्झरी कार, रेसिंग कार (कर 28% वरून 40% झाला).
हानिकारक उत्पादने: सिगार, सिगारेट, तंबाखू, कार्बोनेटेड आणि कॅफिनयुक्त पेये (कर 28% वरून 40% झाला).
सेवा: कॅसिनो, रेस क्लब, जुगार, सट्टेबाजी (कर 28% वरून 40% झाला).
सामान्य माणसाला दिलासा, पण चैनीवर कराचा बोजा
या जीएसटी बदलांमुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या असून, विशेषतः दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. स्मार्ट टीव्ही, कार, आणि घरगुती उपकरणांवरही आकर्षक सवलती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तंबाखूजन्य पदार्थ, लक्झरी वाहने आणि जुगारासारख्या गोष्टींवरील करवाढीमुळे चैनीच्या आणि हानिकारक सवयींना चाप बसेल, असा सरकारचा दावा आहे.


