Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मुसंडी, ममता बॅनर्जींसमोर मोठं आव्हान; केरळमध्ये काट्याची टक्कर

Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मुसंडी, ममता बॅनर्जींसमोर मोठं आव्हान; केरळमध्ये काट्याची टक्कर

Election Result : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रारंभीचे कल समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार आघाडी घेतली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.

एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांत अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर

प्रारंभीच्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप ४० जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस ३५ जागांवर आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात भाजप आणि टीएमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.

केरळमध्ये चुरशीची लढत

केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ प्रत्येकी ३ जागांवर आघाडीवर असून राज्यात काट्याची टक्कर सुरू आहे.

आसाममध्ये भाजपची मजबूत पकड

आसाममध्ये भाजपने २३ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे येथे भाजपच्या एकतर्फी विजयाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सकाळपासूनच नाश्ता आणि दुपारच्या भोजनाची तयारी सुरू आहे.

देशभराचे लक्ष या निकालांकडे लागले असून काही तासांतच या पाच राज्यांचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!