Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

April Rules : PAN कार्ड, ATM पासून ते UPI व्यवहारांपर्यंत 1 एप्रिलपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

April Rules : PAN कार्ड, ATM पासून ते UPI व्यवहारांपर्यंत 1 एप्रिलपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

April Rules : दोन दिवसांनंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पॅन कार्ड, एटीएम आणि युपीआयच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार असल्याने या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

एलपीजी सिलिंडरचे नवीन दर
अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे देशात एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या दरात बदल होणार आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील एलपीजीच्या दरात बदल होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरात वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एलपीजीप्रमाणेच, तेल कंपन्या दर महिन्याला CNG, PNG आणि ATF (विमान इंधन/Aviation Turbine Fuel) यांचे दर देखील सुधारित करून जाहीर करतात. त्यामुळे, 1 एप्रिल 2026 पासून CNG, PNG आणि ATF च्या दरांमध्ये बदल होण्याची आणि नवीन दर लागू होण्याची अपेक्षा आहे.

पॅन कार्डचे नवीन नियम
पॅन कार्डच्या प्रक्रियेत 1 एप्रिलपासून बदल होणार आहे. यापूर्वी आधार कार्डचा वापर करुन पॅन कार्डसाठी अर्ज करता येत होते मात्र एक एप्रिलपासून ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची होणार आहे. नवीन नियमांनुसार, अर्जदारांना आता त्यासोबतच इतर काही पूरक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.

ATM चे नवीन नियम
1 एप्रिल 2026 पासून ATM मधून रोख रक्कम काढण्याशी संबंधित नियमांमध्येही बदल होत आहेत. या बदलांमध्ये UPI ATM साठीच्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेबाबतचे नियम, तसेच वैयक्तिक व्यवहारांवर लागू होणाऱ्या शुल्काबाबतच्या नियमांचा समावेश आहे. हे विशिष्ट नियम वेगवेगळ्या बँकांनुसार भिन्न असू शकतात आणि ते पुढच्या महिन्यापासून लागू होतील.

FASTag वार्षिक पासचे शुल्क
1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पासच्या शुल्कातही वाढ होणार आहे. NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) ने FASTag वार्षिक पासचे वार्षिक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 पासून FASTag च्या वार्षिक पासची किंमत 3000 वरून वाढवून 3,075 केली जाईल. ही सुधारित शुल्क रचना आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू असेल.

RBI चे नवीन 2FA नियम
1 एप्रिल 2026 पासून RBI चे नवीन 2FA (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) नियम अंमलात येतील. RBI च्या या 2FA आदेशाचा परिणाम अशा व्यक्तींवर होईल, ज्या ऑनलाइन खरेदी करतात, UPI द्वारे पैसे देतात किंवा डिजिटल माध्यमातून निधी हस्तांतरित करतात. आतापर्यंत, ऑनलाइन व्यवहारांसाठी केवळ एका साध्या OTP ची आवश्यकता भासत असे परंतु, 1 एप्रिलपासून यात बदल होणार आहे. यापुढे, प्रत्येक व्यवहारासाठी सुरक्षेच्या किमान दोन वेगवेगळ्या स्तरांची म्हणजेच 2FA ची आवश्यकता असेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!