दुबई: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे. दुपारी एअर शो सुरू असताना तेजस लढाऊ विमान कोसळले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत अपघाताची भीषणता दिसून येत आहे. आकाशातून वेगात येणारे तेजस जमिनीवर कोसळल्यानंतर लगेचच आगीचा गोळा आणि त्यानंतर काळा धूर वर आल्याचे पाहायला मिळाले आहे. या अपघातानंतर एअर पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वैमानिक सुरक्षित आहे का अद्याप अस्पष्ट
अपघात होण्यापूर्वी वैमानिक सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला की नाही, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. मात्र, व्हिडीओत कोणतीही व्यक्ती त्यावेळी विमानातून बाहेर पडली नसल्याच दिसत आहे. त्यामुळे विमान असलेले कोणीही वाचले असतील अशी शक्यता नाही.हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने(एचएएल) तयार केलेले हे विमान शुक्रवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार वाजता हवाई कसरती करत असताना कोसळले. यावेळी हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
IAF LCA Tejas fighter jet crashes In dubai
byu/Relative_Level_7436 inaviationअपघातानंतर भारतीय हवाई दलाने सदर अपघाताची कबुली दिली असून अपघाताबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. हवाई दलाच्या निवेदनात म्हटले, “दुबई एअर शो-मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस विमान कोसळले. अधिक तपशीलाची खात्री केली जात आहे, लवकरच संपूर्ण माहिती दिली जाईल.”


