Today रविवार, 20th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात सोने 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात सोने 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त

पुणे: सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरु आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळत आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज घसरले आहेत. काल सकाळी सोन्याचा दर 1,22,881 रुपयांवर होता. 732 रुपयांनी कालच्या तुलनेत सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,22,149 रुपये एक तोळ्यावर पोहोचले आहेत. चांदीचा दर काल 1,55,840 रुपयांवर होता. कालच्या तुलनेत चांदीचा दर 4,465 रुपयांनी कमी झाला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचा दर 1,21,660 रुपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,11,888 रुपयांवर आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 91612 रुपये प्रतितोळा इतका आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 71,457 रुपये प्रति तोळा आहे.

आठवड्यात सोन्याचे दर 3000 रुपयांनी घसरले

गेल्या आठवड्यातील शुक्रवारी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार सोन्याचा दर 1,25,428 रुपये प्रति तोळा इतका होता. तर, 23 कॅरेट सोन्याचा दर 1,24,794 रुपये प्रति तोळा होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा दर आठवड्यात 3,009 रुपयांनी घटला आहे.

सोन्याच्या दराप्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. 14 नोव्हेंबरला चांदीचा दर 1,59,367 रुपयांवर होता. त्यामध्ये 7,992 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्याकाळात सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दररोज दोनवेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता सोन्याचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या दर आणि तुमच्या शहरातील सोन्याचे दर यामध्ये 1000 ते 2000 रुपयांचा फरक असेल. सोने खरेदीवर तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो. याशिवाय मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतात.

सोन्याचे दर का वाढतात ?

2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा दर 75 हजारांवर होता. तो सध्या 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. भूराजनैतिक संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. याशिवाय जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोनं इतर चलनात खरेदी करणाऱ्यांसाठी स्वस्त होतं. त्यावेळी सोन्याची मागणी वाढते.

अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता असल्यास सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं देखील सोन्याची मागणी वाढलेली आहे. विविध केंद्रीय बँकांकडून डॉलर ऐवजी सोने खरेदी करुन ठेवण्यास प्राधान्य दिलं जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!