Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ना जर्सी, ना बॅट…स्मृती मानधनाने क्रिकेटच्या मैदानावर सुरू केली नवीन इनिंग; टीम इंडियाच्या खेळाडूने केली मोठी घोषणा

ना जर्सी, ना बॅट…स्मृती मानधनाने क्रिकेटच्या मैदानावर सुरू केली नवीन इनिंग; टीम इंडियाच्या खेळाडूने केली मोठी घोषणा

Smriti Mandhana Engagement: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल आता आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. या जोडप्याचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून, याआधीच त्यांनी एंगेजमेंट करून चाहत्यांना खूशखबर दिली आहे.

व्हायरल एंगेजमेंट व्हिडिओ

पलाश मुच्छलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेजमेंटचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाला डोळ्यावर पट्टी बांधून डीवाय पाटील स्टेडियममध्ये नेले गेले. मैदानाच्या मध्यभागी पट्टी काढताच पलाशने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. स्मृतीने अंगठी स्वीकारली आणि दोघांनी मिठी मारली. या क्षणाचे भावनिक दृश्य पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड प्रेम व्यक्त केले.

लग्नाची तारीख आणि उत्सुकता

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्याबाबत सुरुवातीला असे वृत्त होते की ते २० नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत, परंतु अंतिम तारीख २३ नोव्हेंबर २०२५ निश्चित झाली आहे. हे जोडपे अनेक वर्षांच्या नात्याला आयुष्यभराच्या सहवासात रूपांतरित करत आहे.

हेही वाचा – हार्दिक पंड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? सोशल मीडियाव फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कुटुंबियांनाही शुभेच्छा दिल्या आणि जोडप्याला आनंदी आणि जबाबदार आयुष्यासाठी प्रोत्साहित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एंगेजमेंट व्हिडिओनंतर चाहत्यांनी जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला. क्रिकेट चाहत्यांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी स्मृती आणि पलाशच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!