Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भारत-अमेरिका व्यापारात नवं पर्व; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत, मोठ्या कराराची तयारी

भारत-अमेरिका व्यापारात नवं पर्व; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत, मोठ्या कराराची तयारी

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांना नवं बळ मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या मोठ्या आयात शुल्कानंतर आता दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यानंतर आणि मोदींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे व्यापार कराराच्या चर्चेला गती मिळाली आहे.

काल 15 सप्टेंबर रोजी, अमेरिकेची विशेष व्यापार चर्चा टीम भारतात दाखल झाली आहे. आज, 16 सप्टेंबर रोजी, उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देश प्रलंबित व्यापारी मुद्द्यांवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचाही या चर्चेत सहभाग असेल, कारण काही मुद्दे राजनैतिक स्वरूपाचे आहेत. याशिवाय, भारत युरोपियन युनियनशीही उच्चस्तरीय संवाद साधत आहे.

IPEF फ्रेमवर्कवर विशेष लक्ष

या बैठकीत इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी (IPEF) अंतर्गत आर्थिक सहकार्य, उत्पादने आणि व्यापार यावर सविस्तर चर्चा होईल. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.

MSME आणि निर्यातीला चालना

भारत सरकार “एक्सपोर्ट प्रमोशन मिशन” अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये याची घोषणा झाली असून, पुढील सहा वर्षांत निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा आणि छोट्या उद्योजकांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे.

एक्सपोर्ट मिशनसाठी वाढीव निधी
सूत्रांनुसार, या मिशनसाठी सध्याच्या 2,250 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देण्याचा विचार सुरू आहे. हा मिशन पाच वर्षांसाठी राबवला जाईल. मंत्रालयाने यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असून, लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!