Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘माझी पत्नी पाकिस्तानी गुप्तहेर आहे…’,व्यावसायिकाच्या आरोपाने एकच खळबळ; म्हणाले…. ‘आम्हाला जीवे मारण्याच्या मिळाल्या धमक्या ‘

‘माझी पत्नी पाकिस्तानी गुप्तहेर आहे…’,व्यावसायिकाच्या आरोपाने एकच खळबळ; म्हणाले…. ‘आम्हाला जीवे मारण्याच्या मिळाल्या धमक्या ‘

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका व्यावसायिकाने त्याच्या पत्नीवर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला आहे. त्याची पत्नी अनेक वेळा पाकिस्तान आणि चीनला गेली. तसेच लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांनी ती गायब झाली आणि तो अजूनही तिचा शोध घेत आहेत. परंतु, त्याच्या पत्नीचा कोणताही पत्ता लागलेला नाही. आता त्याने या प्रकरणात पोलिसांकडून चौकशीची मागणी केली आहे.

नोएडाच्या सेक्टर १०५ मधील जज कॉलनीमध्ये राहणारे व्यापारी लोकेश राठी यांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध दिल्ली आणि नोएडा पोलिसांकडे तक्रार केली. एवढेच नाही तर त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून त्यांच्या पत्नीविरुद्ध चौकशीची मागणी केली आहे. लोकेश यांचे लग्न सुमारे ६ वर्षांपूर्वी मथुरा येथील एका महिलेशी झाले होते. दोघांनीही २०१९ च्या डिसेंबर महिन्यात एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे लग्न केले. मार्च २०२० मध्ये लोकेशची यांची पत्नी बेपत्ता झाली.

पत्नीच्या पासपोर्टची चौकशी करण्याची मागणी
लोकेश राठी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी २०२० मध्ये होळीनिमित्त मथुरा येथील तिच्या माहेरी गेली होती आणि परत आली नाही. पत्नीचा शोध घेण्यासाठी त्यांनी नोएडाच्या सेक्टर-३९ पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. महिलेचा शोध घेतला असता नवीन रहस्ये उघड झाली. आता लोकेश यांनी त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट देखील तपासण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानातील मुलाशी लग्न 
लोकेश राठी सांगतात की, त्यांची पत्नी अनेक वेळा पाकिस्तानला गेली आहे. यासोबतच त्यांची पत्नी २००४ मध्ये चीनला गेली होती. ती चीनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तसेच त्यांच्या पत्नीचे पहिले लग्न २००८ मध्ये झाले होते. तिने पाकिस्तानातील अतिक नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा आहे, जो पाकिस्तानात राहतो. जेव्हा ती चीनमध्ये राहत होती, तेव्हाही ती पाकिस्तानला गेली होती आणि तीन महिन्यांहून अधिक काळ तिथे राहिली.

व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी
लोकेश यांनी असेही सांगितले की, जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीच्या पाकिस्तान दौऱ्यांबद्दल आणि तिच्या ठावठिकाणाबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. लोकेश यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा खटलाही दाखल केला. हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्याला लोकेश यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु त्यांच्या पत्नीवर घरगुती हिंसाचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हजर न राहण्याचा आरोप आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!