नवी दिल्ली : रेल्वेचा आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार आहे. सध्या आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या चार तास आधी तयार होतो. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाचे अधिक चांगले नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ८ तास आधी आरक्षण चार्ट तयार झाल्यामुळे प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांची अनिश्चितता कमी होईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. नव्या निर्णयानुसार दुपारी २ वाजेपूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण चार्ट आदल्या रात्री नऊ वाजता तयार होतील. हा निर्णय टप्प्याटप्याने लागू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. नव्या अद्ययावत प्रवासी आरक्षण यंत्रणेत (पीआरएस) आता दर मिनिटाला दीड लाखाहून अधिक तिकीट बुकिंग होईल. सध्याच्या यंत्रणेनुसार दर मिनिटाला अवघ्या ३२ हजार तिकिटांचे बुकिंग होऊ शकते. त्यामुळे अद्ययावत पीआरएसद्वारे बुकिंगची क्षमता पाच पटीने वाढेल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. अद्ययावत पीआरएसमध्ये प्रवाशांना त्यांच्या आवडीचे आसन निवडीचा पर्याय असेल. तसेच प्रवास भाड्याचे कॅलेंडर त्यांना दिसेल.
अलीकडेच रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट आरक्षण यंत्रणेत काही बदल केले आहेत. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना त्यांच्या तिकिटाच्या स्थितीबाबत रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी माहिती देण्यास रेल्वे मंत्रालयाने सुरुवात केली. प्रायोगिक पातळीवर सुरु झालेली ही सेवा लवकरच देशभलागू होईल. तसेच तत्काळ तिकिटांच्या आरक्षणाबाबतह रेल्वेने काही नियम केले आहेत. त्यानुसार मंगळवार १ जुलैपासू आधार संलग्न असलेले यूजर्सच् आयआरसीटीसीचे संकेतस्थळ मोबाईल अॅपवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात. १८ जुलैपासून तत्काळ बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणदेखील अनिवार्य करण्यात येणार आहे. काउंटरवरून बुकिंगदेखील सिस्टिम जनरेटेड ओटीपी आल्यानंतरच होईल. मंत्रालयाने या नव्या नियमांच्या दृष्टीने यंत्रणेत बदल करण्याचे निर्देश आयआरसीटीसीला दिल् आहेत.


