नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला धडा शिकवला आणि गुडघे टेकण्यास भाग पाडले. संपूर्ण जगाने भारताचे शौर्य पाहिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे निवडकपणे उद्ध्वस्त केले. आता देशाची गुप्तचर संस्थाही देशात लपलेल्या अशा देशद्रोह्यांना शोधत आहे, जे गुप्तपणे पाकिस्तानला गुप्त माहिती देत होते.
आतापर्यंत, गुप्तचर संस्थेने हरियाणा येथून युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि गुजरात येथून मोहम्मद मुर्तजा अली यांना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान अनेक खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय गुप्तचर एजंट्सची ओळख पटवू इच्छित होती. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगमधून हे उघड झाले.
कटाची संपूर्ण योजना चॅटमध्ये उघड
गप्पा मारताना अली हसनने ज्योती मल्होत्राला सांकेतिक शब्दात विचारले की, जेव्हा ती अटारी सीमेवर गेली, तेव्हा तिला तिथे असा कोणी गुप्तहेर एजंट सापडला का? ज्याला काही खास प्रोटोकॉल अंतर्गत प्रवेश देण्यात आला होता.
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील रहिवासी
हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला १७ मे २०२५ रोजी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिच्यावर एहसान-उर-रहीम (उर्फ दानिश) यासह आयएसआयच्या अधिकाऱ्यांसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. ज्योती मल्होत्रा हिने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचा आरोप आहे. ती एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे आयएसआय ऑपरेटर्सच्या संपर्कात होती. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांमधून हे उघड झाले आहे.
दोघांमधील संभाषण:
- अली हसन– जब आप गए थे अटारी, वहां प्रोटोकॉल किस-किस को मिला था.
- ज्योती मल्होत्रा– किसको मिला, मुझे तो मिला नहीं.
- अली हसन- इट मीन, कोई अंडर कवर पर्सन हो जैसे, यार पता चल जाता है देखकर, आप को कैसे निकालना था या उसको अंदर लेकर आना था. इट्स माय मैटर, उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने, रूम में दोनों को बैठा देना था, अभी लगे रहो.
- ज्योती मल्होत्रा- नहीं इतने पागल थोड़ी न थे वो.


