Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! 2011 मधील त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! 2011 मधील त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

महाराष्ट्र जागरण डेस्क : ”जपानी बाबा वेंगा” म्हणून ओळखले जाणारे जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी यांनी जुलै २०२५ मध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली आहे. या आपत्तीचा उल्लेख त्यांच्या १९९९ च्या ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकात करण्यात आला होता, जे २०२१ मध्ये अपडेट केले आहे. अपडेट केलेल्या आवृत्तीत, तात्सुकी यांनी जपान आणि आसपासच्या देशांना मोठ्या प्रमाणात त्सुनामी आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली आहे.

होऊ शकतो ज्वालामुखीचा उद्रेक
तात्सुकीने त्यांच्या पुस्तकात लिहले आहे की, जपानच्या दक्षिणेकडील समुद्र उकळत आहे, ज्यामुळे मोठे बुडबुडे निर्माण होत आहेत. हे पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे लक्षण मानले जात आहे. त्यांच्या मते, ही घटना जुलै २०२५ मध्ये घडू शकते आणि त्यामुळे निर्माण होणारी त्सुनामी २०११ च्या त्सुनामीपेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकते.

जपानमध्ये भीतीचे वातावरण
तात्सुकी यांनी आपत्तीचे केंद्र जपान, तैवान, इंडोनेशिया आणि उत्तर मारियाना बेटांमधील हिऱ्याच्या आकाराच्या भागात असल्याचे वर्णन केले. त्यांच्या भविष्यवाणीत ड्रॅगनसारखे आकार देखील दिसतात, ज्याचा संबंध काही लोक हवाईशी जोडत आहेत. तात्सुकी यांच्या भविष्यवाणीमुळे जपान आणि आजूबाजूच्या देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः हाँगकाँग आणि चीनमधील पर्यटकांनी त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द केले आहे, ज्यामुळे जपानच्या पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर #July2025Prediction हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. लोक या भाकितावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

”जापानी बाबा वेंगा” अर्थात रियो तात्सुकी कोण ?
रियो तात्सुकी हे १९८० च्या दशकात एक मंगा कलाकार होते. स्वप्नात जे काही दिसायचे, ते ती तिच्या डायरीत लिहून ठेवायची, जी नंतर पुस्तक म्हणून प्रकाशित झाली. तात्सुकी यांचे भाकीत यापूर्वीही खरे ठरले आहेत. १९९१ मध्ये त्यांनी राजकुमारी डायनाच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली. याशिवाय, त्यांनी १९९५ मध्ये जपानमधील कोबे भूकंप, २०११ मध्ये तोहोकू भूकंप आणि त्सुनामीचीही भविष्यवाणी केली होती. या घटना घडल्यानंतर, त्याच्या भाकितांवरील विश्वास आणखी वाढला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!