Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोणाला पॅनल करायचा त्यांनी करा… मी समोरचा पॅनल तगडा आहे, असे समजून लढणार; अजित पवारांची घोषणा

कोणाला पॅनल करायचा त्यांनी करा… मी समोरचा पॅनल तगडा आहे, असे समजून लढणार; अजित पवारांची घोषणा

बारामती: माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याचा १५ लाख गाळपाचा विक्रम आहे. माळेगावला तिकीट देताना मोठा बदल करणार आहे. कोणाला पॅनल करायचा त्यांनी करा, मी समोरचा पॅनल तगडा आहे, असे समजून लढणार आहे. १३ जून रोजी प्रचाराचा नारळ फोडताना चेअरमन जाहीर करणार आहे. माळेगावच्या सभासदांनी माझ्याकडे बघून मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुरुवार, २२ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, कारखान्याच्या ३७ गावांतील १९ हजार ६५१ सभासद असून, अनेक जण मुख्यमंत्र्यांना सांगत होते. निवडणुका लवकर लावा, उठसुठ काहीजण मुंबईला जात होते. आपण महायुतीत काम करतो, काहीजण आम्ही अमित शाह यांच्याकडून काम करून आणतो, असे सांगतात. त्यावर पवार म्हणाले, अरे बाबा अमित शाह तुला ओळखतात का? जर माझ्या मतदारसंघात लक्ष घालत असाल, तर मलादेखील तिकडे लक्ष घालावे लागेल. मी धडधाकट आहे, असे नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.

संचालकांना सुनावले

माळेगाव साखर कारखान्याचे ऊसाला चांगला भाव दिला असून, यापुढे कारखान्याची संचालकाना गाडी बंद करणार आहे. कोणी काय उद्योग केले ते मी पाहणार आहे. अतिरिक्त खर्च थांबवणार, तोडणी वाहतूक विकास शिफारस चालू देणार नाही. आता माळेगावमध्ये लक्ष घालणार आहे, कारखान्याचे घाण पाणी बंद करणार, केंद्र-राज्यांच्या योजना, हार्वेस्टिंग, कृषीच्या योजना आणणार आहे. ज्यांना पॅनलमध्ये जागा मिळाली नाही, त्यांनी नाराज होऊ नका. उद्योगपतींकडून सीएसआर फंडातून कारखान्याला मदत करणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!