Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Work From Home: WFH ला मिळणार कायदेशीर दर्जा? IT संघटनेचे सरकारला पत्र

Work From Home: WFH ला मिळणार कायदेशीर दर्जा? IT संघटनेचे सरकारला पत्र

Work From Home: देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा (WFH) मंत्र दिला आहे. याच मंत्राचा आधार घेत आता आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. आयटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणारी प्रमुख संघटना ‘निटेस’ने (NITES) केंद्र सरकारकडे धाव घेत, घरून काम करण्याच्या पद्धतीला आता कायमस्वरूपी ‘कायदेशीर कवच’ देण्याची मागणी केली आहे.

नेमकी मागणी काय?
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांना ११ मे २०२६ रोजी धाडलेल्या पत्रात ‘निटेस’ने स्पष्ट केले की, ‘वर्क फ्रॉम होम’ ही केवळ आपत्कालीन सोय न राहता ती एक अधिकृत कार्यपद्धती बनायला हवी. यासाठी सरकारने विशेष कायदा किंवा नियमावली तयार करावी, जेणेकरून आयटी आणि आयटीईएस (ITES) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन’ला आयटीचा पाठिंबा
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि तणावामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारताचा आयात खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी सार्वजनिक वाहतूक आणि घरून कामाचा पर्याय सुचवला होता. आयटी संघटनेच्या मते, जर लाखो आयटी कर्मचारी घरून काम करू लागले, तर कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोल-डिझेलची बचत होऊन देशाचे परकीय चलन वाचेल. रस्त्यांवरील गाड्यांची संख्या घटल्याने हवेची गुणवत्ता सुधारेल. वाहतूक कोंडीत जाणारा कर्मचाऱ्यांचा अमूल्य वेळ वाचेल आणि त्यांचे मानसिक आरोग्य सुधारेल.

‘वर्क फ्रॉम होम’ शक्य आहे का?
संघटना म्हणते की, कोरोना महामारीच्या काळात आयटी कंपन्यांनी घरून काम करूनही विक्रमी नफा आणि उत्पादकता मिळवून दाखवली आहे. आज आपल्याकडे ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ आणि ‘सायबर सिक्युरिटी’ची प्रगत साधने असल्याने ऑफिसला जाण्याची तांत्रिक गरज उरलेली नाही. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि पर्यावरणपूरक भारताच्या स्वप्नाला गती देण्यासाठी आयटी क्षेत्र सज्ज आहे. मात्र, सरकारने आता ‘हायब्रीड’ किंवा ‘रिमोट’ वर्किंगला अधिकृत मान्यता देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असा सूर या पत्रातून उमटला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!