Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP vs Shinde Sena: महायुतीत मिठाचा खडा! मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

BJP vs Shinde Sena: महायुतीत मिठाचा खडा! मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

BJP vs Shinde Sena: पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील युतीमधील तणावाचा परीणाम आता थेट मुंबईत पोहोचला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील ‘मैत्रीपूर्ण’ लढतीने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच, दोन्ही मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नेमकी ठिणगी कुठे पडली?

वॉर्ड १७३ मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात सामना रंगला आहे. शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या एकाच परिसरात समोरासमोर आल्या. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चक्क ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा स्वतःच्याच मित्रपक्षाने (भाजप) वापरल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार राडा झाला.

‘दोस्तीत कुस्ती’ की राजकीय दगाफटका?

या वादाची पार्श्वभूमी जागावाटपातील गोंधळामुळे उद्भवली आहे. अधिकृतपणे ही जागा शिंदे सेनेला सुटलेली होती. जागा शिंदे सेनेची असूनही भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी पक्षाचा ‘एबी फॉर्म’ जोडून अर्ज भरला आणि तो वैध ठरला. नाईलाजाने या ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ जाहीर झाली, जी आता थेट वादात रूपांतरित झाली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut Meet Eknath Shinde: संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट; एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस

संजय शिरसाट आक्रमक

या घटनेनंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजपमधील हे ‘महारथी’ कोण आहेत, याचा तपास झाला पाहिजे. अशा घोषणा देण्यापूर्वी आपल्या नेत्यांना विचारायला हवे होते. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत बसला आहात, हे विसरू नका. शिरसाट यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

भाजपची सावध प्रतिक्रिया

दुसरीकडे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असले, तरी मतदानापूर्वी झालेल्या या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!