Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींवर मोठं संकट! केवायसीकरून सुद्धा ‘त्या’ बहिणी झाल्या अपात्र, चिंताजनक माहिती समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींवर मोठं संकट! केवायसीकरून सुद्धा ‘त्या’ बहिणी झाल्या अपात्र, चिंताजनक माहिती समोर

Ladki Bahin Yojana: ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला. दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच आता योजनेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही लाडक्या बहिणींना मोठा फटका बसल्चीया शक्यता आहे. काहीना यावेळीचा हप्ता खात्यातच आलेला नाही.

सरकारने ही योजना चालू करताना काही अटी घातल्या होत्या. मात्र काही महिला या निकषानुसार पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्यानंतर पात्र नसताना देखील लाभ घेणाऱ्या काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं. दरम्यान ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिला समोर याव्यात तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. केवळ अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा या साठी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधकारक केली होती. 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम मुदत होती.

दरम्यान लाभार्थी महिलांनी सरकारच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली केवायसी पूर्ण केली,मात्र यातील अनेक महिला पात्र असूनही आणि त्यांनी केवायसी करून देखील त्या या योजनेसाठी अपात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार ज्या महिलांनी या योजनेसाठी केवायसी केली, त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख करण्यात आल्यानं त्यांचं अनुदान आता बंद झालं आहे.

त्यामुळे या महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत, तसेच काही महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्यानं त्यांची नावं देखील या योजनेतून वगळण्यात आली आहेत. ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आढळून आलं, तसेच ज्यांच्याकडे वाहन आहेत, अशा महिलांची नावं देखील या योजनेतून वगळण्यात आली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!