Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम

कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम

मुंबई: वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कडक शब्दांत कानउघडणी केली. मंगळवारी मंत्रालयात पवार आणि कोकाटे यांच्यात २० मिनिटांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्याने कोकाटे यांच्या कारवाई बाबत सस्पेन्स कायम आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत अजित पवार यांनी कोकाटे यांच्या कृतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, तर कोकाटे यांनी आपली बाजू मांडत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु, कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय झाला नाही. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्यासह महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांना तंबी दिल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक संपताच माध्यमांना गुंगारा देत कोकाटे मंत्रालयातून बाहेर पडत त्यांनी पक्ष कार्यालय गाठले.

कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केल्यानंतर कोकाटे यांच्याविरोधातील आंदोलन आणखीनच पेटले होते. याबाबत पवार यांनी मंगळवारी कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार, मंगळवारी पवार यांनी कोकाटे यांच्यासोबत चर्चा केली, मात्र या बैठकीनंतर कोकाटे यांच्यावरील कारवाई बाबतचा सस्पेन्स कायम आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!