Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजपचा दुसरा मोठा विजय! महाराष्ट्रातील बड्या ‘मंत्र्या’ची पत्नी निवडणुक न लढताच बनली नगराध्यक्ष

भाजपचा दुसरा मोठा विजय! महाराष्ट्रातील बड्या ‘मंत्र्या’ची पत्नी निवडणुक न लढताच बनली नगराध्यक्ष

जामनेर: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची धाकधुक वाढली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयी घौडदौड सुरु केली आहे. महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याची पत्नी निवडणुक लढण्याआधीच नगराध्यक्ष बनली आहे. भाजपला दुसरा मोठा विजय आहे. यामुळे भाजपने विजयाचा गुलाल उधाळायला सुरुवात केली आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची सर्वाच पक्षांकजून जोरदार तयारी सुरु आहे. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपने विजयाचा धडाका लावला आहे. धुळ्यात भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला. यानंतर आता महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याची पत्नी महाराष्ट्रातील दुसऱ्या नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध म्हणून निवडून आल्या आहेत. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत साधना महाजन या नगराध्यक्ष मधून बिनविरोध विजय झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज माघार घेतल्याने साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत.. नगराध्यक्ष बिनविरोध होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे.

नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

धुळे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने खात उघडलं आहे. धुळ्यातील दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्ष पदाचा पाहिला निकाल भाजपाच्या बाजुने लागला आहे. दोंडाईचा नगर पालिका नगराध्यक्ष पदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा येथे विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाली. 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध निवडले गेले आहेत. खांदेशात भाजपाची विजयी सुरुवात झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहायला मिळत आहे.

दोंडाईचा नगरपरिषदेचा मालमत्ता कर थकवल्याच्या मुद्द्यावरून भाजपाचे डॉ. रवींद्र देशमुख यांनी हरकत घेतली होती. सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाळणी अंती उमेदवारी अर्ज बाद ठरवला. दोंडाईचा नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदी नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. राज्याचे राज्य शिष्टाचार आणि प्रधानमंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवर रावल बिनविरोध निवडूण आल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने नयनकुवर रावल बिनविरोध निवडूण आल्या आहेत. याची अधिकृत घोषणा बाकी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!