Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी! ‘या’ तारखेला विधान परिषदेसाठी मतदान; 9 जागांसाठी सत्तेचा पेच सुटणार

Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी! ‘या’ तारखेला विधान परिषदेसाठी मतदान; 9 जागांसाठी सत्तेचा पेच सुटणार

Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, विधान परिषदेच्या 9 रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचे निकालही स्पष्ट होणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मतदानाची वेळ सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

दिग्गजांची आमदारकी संपणार; कुणाची खुर्ची धोक्यात?
येत्या 13 मे रोजी 9 विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये राज्याच्या राजकारणातील अनेक मोठ्या नावांचा समावेश असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवृत्त होणाऱ्या प्रभावी चेहऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके, राजेश राठोड आणि रमेश कराड या दिग्गजांचा समावेश आहे. यातील किती नेत्यांना पुन्हा संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचे पारडे जड
विधानसभेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता, ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांच्या कोट्याची गरज आहे. महायुतीची ताकद पाहता, भाजप (131), शिवसेना-शिंदे गट (57) आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट (40) यांच्या एकत्रित बळावर महायुतीचे 8 उमेदवार सहजपणे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे सध्या 46 आमदारांचे पाठबळ आहे, ज्या जोरावर त्यांचा एक उमेदवार सुरक्षित आहे; मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?
संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते शिल्लक आहेत. जर महायुतीने या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार मैदानात उतरवला, तर ही निवडणूक बिनविरोध न होता अत्यंत चुरशीची ठरू शकते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला आपली दुसरी जागा वाचवणे हे मोठे आव्हान ठरेल. आता सर्व पक्षांच्या रणनीतीवर ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदानाची वेळ येणार, हे अवलंबून आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!