Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोदी सरकारने निवडणूक आयोगाची निष्पक्षता नष्ट केली; मोदी सरकारचे संविधान व लोकशाहीवर हल्ले सुरूच

मोदी सरकारने निवडणूक आयोगाची निष्पक्षता नष्ट केली; मोदी सरकारचे संविधान व लोकशाहीवर हल्ले सुरूच

नवी दिल्ली : देशात ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’ अर्थात ‘इव्हीएम’वर विरोधकांनी शंका उपस्थित केली असतानाच आता निवडणूक नियम बदलण्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. मतदानासंबंधित इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सार्वजनिक करण्यास नकार देणे व इतर निवडणूक नियम बदलून केंद्र सरकारने निवडणूक आयोगाची निष्पक्षता नष्ट केली आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या शिफारशीवरून केंद्रीय विधी मंत्रालयाने सार्वजनिक निरीक्षणासाठीच्या दस्तावेजांवर बंदी घालण्यासाठी ‘निवडणूक संचलन नियम-१९६१ च्या ९३ (२) (अ)’ मध्ये दुरुस्ती केली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग फुटेज तथा उमेदवारांची व्हिडिओ रेकॉर्डिंगसारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तावेजांचे सार्वजनिक निरीक्षण करण्यास मज्जाव केला आहे. या दस्तावेजांचा गैरवापर होता कामा नये. म्हणून निवडणूक नियम बदलल्याचे कारण सरकारने पुढे केले आहे. परंतु, या मुद्यावरून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

ते म्हणाले की, मोदी सरकार निवडणूक आयोगाची निष्ठा जाणीवपूर्वक संपवत आहे. या सरकारने केलेला हा संविधान व लोकशाहीवरील हल्ला आहे. निवडणूक संचलन नियमांमध्ये बदल करण्याचे धाडस दाखवत केंद्र सरकारने निवडणूक आयोगाची निष्पक्षता नष्ट केली आहे. यापूर्वी सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त निवड समितीतून डच्चू देण्यात आला. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणुकीची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप खरगे यांनी केला. ईव्हीएमची पारदर्शकता कमी असणे व निवडणुकीतील अनियमिततेच्या मुद्यावर आपण यापूर्वी आयोगाला पत्र लिहिले होते. मात्र, आयोगाने आम्हाला अतिशय तिरस्कारपूर्वक शैलीत उत्तर दिले.

आम्ही मांडलेल्या गंभीर तक्रारींकडे कानाडोळा केला. यावरून निवडणूक आयोग अर्धन्यायिक संस्था असतानाही स्वतंत्ररीत्या व्यवहार करताना दिसत नाही, असा हल्लाबोल खरगे यांनी केला. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या नियमांत बदल करण्यास आम्ही कायदेशीररीत्या आव्हान देणार असल्याचे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!