Today बुधवार, 23rd सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मतमोजणी पुढे ढकलण्यात येणार नाही! नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मतमोजणी पुढे ढकलण्यात येणार नाही! नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून निर्माण झालेला कायदेशीर पेच अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाली काढला आहे. निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर व्हावा, असा नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत, मतमोजणी पुढे ढकलण्याची मागणी थेट फेटाळून लावली आहे.

पूर्वीचा आदेश कायम

या प्रकरणाची सुनावणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात झाली. याचिकाकर्त्यांनी २ डिसेंबरला पार पडलेल्या मतदानाचा आणि २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाचा निकाल वेगवेगळ्या दिवशी जाहीर व्हावा, अशी मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की निकाल २१ डिसेंबरपर्यंत थांबवू नये. मात्र, न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरण्यास नकार देत, पूर्वीचा आदेशच कायम ठेवल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – मोठी बातमी! BMC निवडणूक दुसऱ्या आठवड्यातच होणार; राज्य निवडणूक आयोगाची तयारी जोरात

दोन्ही टप्प्यांचा निकाल एकाच दिवशी

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात ठाम सांगितले की, २ डिसेंबर आणि २० डिसेंबरला झालेल्या दोन्ही मतदानांचा निकाल एकत्रितरित्या २१ डिसेंबरलाच घोषित केला जाईल.

राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश

न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २० डिसेंबरच्या मतदानात कोणतीही अडचण निर्माण झाली किंवा मतदान पार पडू शकले नाही, तरीही निकालाची तारीख बदलणार नाही. निवडणुकीची प्रक्रिया आणखी लांबणीवर टाकण्यास न्यायालयाने ठाम मनाई केली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केले.

हेही वाचा – महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता ‘या’ दिवशी लागणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितली तारीख

राजकीय वर्तुळात निकालाची उत्सुकता शिगेला

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता २१ डिसेंबर हा अंतिम निकालाचा दिवस निश्चित झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची उत्सुकता ताणावर पोहोचली आहे. उमेदवारांमध्येही निकाल जाहीर होण्याची प्रतिक्षा अधिक तीव्र झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!