Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“मला शिव्या द्या… पण संघावर आल्यावर…”; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण

“मला शिव्या द्या… पण संघावर आल्यावर…”; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण

Ramesh Pardeshi Join BJP:मुळशी पॅटर्नचित्रपटातून पिट्या भाई म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी मंगळवारी रात्री भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. रमेश परदेशी हे गेले काही दिवस त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दौरा केला होता. त्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षबांधणीच्या कामातील दिरंगाईवर त्यांच्या शैलीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी रमेश परदेशी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या जिव्हाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं. आरएसएसच्या गणवेशातील पथसंचलनाच्या फोटोवरुन राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर रमेश परदेशी काहीसे नाराज होते अशी चर्चा होती. मात्र, मंगळवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश घेतला.

याच बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी पिट्या भाई फेम रमेश परदेशी यांना थेट फटकारल्याची चर्चा होते. राज ठाकरेंनी परदेशी यांना स्पष्टपणे “तू छातीठोकपणे सांगतोस की, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर मग इथे कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी निश्चित भूमिका घे,” असं म्हटल्याचे माध्यमांनी म्हटलं होतं. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट आणि थेट सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता. या घटनेनंतर काही दिवस रमेश परदेशी शांत होते.

हेही वाचा: ड्रोन घ्या, पिंजरे लावा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मनसेमधून भाजपामध्ये प्रवेश

राज ठाकरेंच्या या सल्ल्यानंतर रमेश परदेशी काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री त्यांनी मनसेची साथ सोडण्याचा निर्णय घेत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता रमेश परदेशी यांनी लोकमतसोबत बोलताना मनसे सोडण्याचे कारण सांगितले.

“त्या दिवशी शाखाध्यक्षांची अतिशय गोपनिय बैठक होती. तिथे राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी तुझं संघ वगैरे काय आहे असं विचारलं. त्यावर मी साहेब आहे, मी इथे 18 वर्षे जसं काम करतोय तसंच लहानपणापासून संघही आहे, असं म्हटलं. त्यावर त्यांनी मिश्किल पद्धतीने बंद करा रे असं म्हटलं. मलाही हाच प्रश्न पडला आहे की त्यांना आताच संघात असण्यावर आक्षेप का आला. कारण गेली 20 वर्षे मी तुमच्याशी संबंधित आहे. आधीपासून माझ्या फेसबुकवर संघाच्या संचालनाचे फोटो दिसतील. इतके वर्षे फोटो असताना आताच का तो विषय निघाला हे कळत नाहीये. मला सुद्धा याची कल्पना नव्हती. राज ठाकरे बोलले त्याचे वाईट वाटले नाही कारण त्यांची ती पद्धत आहे आणि त्यांना तो अधिकार आहे,” असे रमेश परदेशी म्हणाले.

“हे कुणी आणि का केलं हा प्रश्न मला पडला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असती तर मी समजू शकतो. पण तसलं काही नाही. पक्षाला माझ्याकडून जी मदत शक्य होती ती मी करत होतो. मला शिव्या दिल्या तरी फरक पडणार नाही. पण जो विचार तुमच्या बरोबर आहे, जे संस्कार तुम्ही घेऊन चालला आहात ते संघाचे आहेत. मग त्याच्यावर आल्यानंतर थोडा मी व्यवहार्य होणार ना. कारण मी एकटा स्वयंसेवक नाही. माझ्या कुटुंबातील लोकही संघाचे सदस्य आहेत. असं असतानाही मी मनसेसोबत काम करत होतो. माझ्या विचारांचा विषय होता म्हणून निर्णय घेतला,” असंही रमेश परदेशी यांनी म्हटलं.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!