मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन सदर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


