मुंबई: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे-पालवे यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गौरीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून हत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यासाठी ते शनिवारी रात्रीपासून पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
अखेर वरळी पोलिस ठाण्यात गौरी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अनंत गर्जे, त्यांची बहीण शितल गर्जे, भाऊ अजय गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गौरीच्य वडिलांना दिलेल्या जबाबात सांगितले की, गौरी आणि अनंतच्या लग्नानंतर घराचे शिफ्टींग करताना गौरीला काही कागदपत्रे सापडली. या कागदपत्रात किरण नावाच्या महिलेचे गर्भपातासाठी संमतीपत्र होते. आणि त्यावर पती म्हणून अनंत गर्जेचे नाव होते. यावरून गौरी आणि अनंतमध्ये भांडण झाले.
अनंतने या विषयी घरच्यांना सांगू नको म्हणून गौरीवर दबाव टाकला. तसेच तिने घराच्यांना काही सांगितले आपण आत्महत्या करून गौरीचे नाव चिठ्ठीत लिहून ठेऊ अशी धमकी देखील अनंतने गौरीला दिली होती, असे देखील गौरची वडिलांनी जबाबात म्हटले आहे.
…तेव्हा मी घरी नव्हतो
अनंत गर्जे गौरीच्या आत्महत्येविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. मी घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी मी 31 व्या मजल्यावर गेलो आणि तेथून 30 व्या मजल्यावर असलेल्या माझ्या घरात खिडकीतून प्रवेश केला. तेव्हा गौरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे मला दिसले.
अंनतकडून गौरीला मारहाण…
दरम्यान, गौरीच्या वडिलांना जबाब देताना धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या जबाबात नोंदवले आहे की, लग्नाच्या काही महिन्यातच अनंत याचे बाहेर एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरीला कळले होते. त्यातून ती मानसिक तणावात होती. त्यामुळे घरात भांडणं देखील होत होते. गौरीला तिचा पती अनंत हा मारहाण देखील करत होता.


