Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shiv Sena and AIMIM Alliance: परळीमध्ये एकनाथ शिंदे यांची ‘एआयएमआयएम’ सोबत युती, अजित पवार देखील सोबत

Shiv Sena and AIMIM Alliance: परळीमध्ये एकनाथ शिंदे यांची ‘एआयएमआयएम’ सोबत युती, अजित पवार देखील सोबत

Eknath Shinde Ajit Pawar Asaduddin Owaisi Alliance: अकोटमध्‍ये भाजप आणि एआयएमआयएमची युती झाल्‍याचा राजकीय धुरिणांना धक्‍का बसलेला असतानाच बीडमधील नवीन समीकरणामुळे सत्‍तेचा अजब खेळ पाहावयास मिळाला. परळी नगरपरिषदमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चक्क एमआयएमला सोबत घेऊन आपला गट स्थापन केला आहे.

नगरपरिषदेत गट नेत्याची निवड

या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी हिंदुत्‍वाच्‍या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे. परळी नगरपरिषदेत एकूण 35 नगरसेवक आहेत. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. आता नगरपरिषदेत गट नेत्याची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपली ताकद एकत्र केली.

एमआयएम अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतल

या प्रक्रियेत त्यांनी एमआयएमच्या एका नगरसेवकाला आणि काही अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले आहे. या नव्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, शिवसेनेचे 2, एमआयएमआयएमचा 1 आणि 4 अपक्ष अशा एकूण 24 नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची या गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

अकोट आणि अंबरनाथचे प्रकरण

दरम्‍यान, अकोट आणि अंबरनाथचे प्रकरण शांत होत नाही तोच परळीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने एमआयएमला सोबत घेतल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!