Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकीय समीकरणे बदलणार! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार? ‘या’ व्यक्तीने केला मोठा गौप्यस्फोट

राजकीय समीकरणे बदलणार! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार? ‘या’ व्यक्तीने केला मोठा गौप्यस्फोट

Dhananjay Munde Delhi Visit: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घडामोडी समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयाने एका प्रकरणात अटक वॉरंट बजावल्याने त्यांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या आदेशानंतर कोकाटे यांना कधीही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. कारण त्याचवेळी मंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. कोकाटे यांच्या मंत्रिपदावर संकट निर्माण झाल्यामुळे, हे पद आता धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांनी यावर भाष्य करत मोठा दावा केला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला. धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही करुणा मुंडे यांनी केला आहे.

हेही वाचा –Manoj Jarange: धनंजय मुंडेंकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजित पवारांनी पापात सहभागी होऊ नये; मनोज जरांगेंचा इशारा

करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप असून वाल्मिक कराड प्रकरणातही त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठीच दिल्लीमध्ये हालचाली सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. वाल्मिक कराड याला बाहेर काढण्यासाठी आणि संपूर्ण प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Manoj Jarange : अजितदादांचे पाय धरून ‘त्या’ प्रकरणात माघार घेतली; मनोज जरांगेचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

तथापी, करुणा मुंडे यांनी जाहीर केलं की, या मुद्द्यावर त्या शनिवारी पत्रकार परिषद घेणार असून, या लढ्यात साथ देण्यासाठी ५० राजकीय पक्षांना आवाहन करणार आहेत. दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी अधिक गंभीर झाल्या आहेत. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!