मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?
चंद्रकांत रघुवंशी हे धुळे-नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. ते 1992 पासून राजकारणात आहेत. ते सहा वर्षे धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते सलग तीनवेळा विधानपरिषदेत निवडून गेले होते. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटात सामील झाले होते. आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे


