Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanghamitra Chaudhari : बारामतीचा पॅटर्नचं वेगळा! सर्वात तरुण नगरसेविका संघमित्रा चौधरींची हत्तीवरून मिरवणूक

Sanghamitra Chaudhari : बारामतीचा पॅटर्नचं वेगळा!  सर्वात तरुण नगरसेविका संघमित्रा चौधरींची हत्तीवरून मिरवणूक

Sanghamitra Chaudhari : ‘बारामतीचं राजकारण नेहमीच अनपेक्षित असतं’ या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पैशांचा पाऊस आणि प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, बारामतीकरांनी एका उच्चशिक्षित आणि तरुण लेकीच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या संघमित्रा काळुराम चौधरी यांची नगरसेवकपदी निवड झाली असून, त्यांच्या या विजयाचा जल्लोष चक्क हत्तीवरून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.

प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात ‘बहुजन’ क्रांती

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना साथ देणाऱ्या आणि विधानसभेत अजित पवारांवर विश्वासाची मोहोर उमटवणाऱ्या बारामतीकरांनी नगरपालिकेत मात्र स्वतंत्र बाणा दाखवला आहे. मतदारांना गृहीत धरणाऱ्या बड्या पक्षांना चपराक देत बारामतीकरांनी नेतृत्व निवडताना उमेदवाराच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले. बहुजन समाज पक्षाच्या (BSP) तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या संघमित्रा यांच्या रूपाने बारामतीला सर्वात तरुण आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी मिळाली आहे.

हेही वाचा – NCP Star Campaigners List : महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादांची फौज सज्ज! 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कोण आहेत संघमित्रा चौधरी?

संघमित्रा या उच्चशिक्षित असून त्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. एका सामान्य घरातील आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या पित्याची ती कन्या आहे. संघमित्रा यांनी केवळ आपल्या विचारांच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर विजय मिळवून संविधानाची ताकद सिद्ध केली आहे.

हेही वाचा – Nagar palika election : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जबर धक्का

बारामतीकरांचे ‘वेगळे’ जनमत

बारामती नगरपालिकेच्या या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, ‘विकास करण्यासाठी तुमचे नेतृत्व मान्य असले, तरी आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी कोण असावा, याचा निर्णय आम्हीच घेऊ.’ या निवडणुकीत तब्बल सहा अपक्ष आणि इतर उमेदवारांनी मुसंडी मारली असून, त्यात संघमित्रा यांचा विजय राज्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

लेकीचा सन्मान; हत्तीवरून मिरवणूक

आज बारामतीच्या रस्त्यांवर संघमित्रा यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा संपूर्ण शहर थबकले होते. केवळ एका पक्षाचा विजय म्हणून नाही, तर एका सुशिक्षित आणि संघर्षशील मुलीचा सन्मान म्हणून बारामतीकर रस्त्यावर उतरले होते. ही मिरवणूक म्हणजे घराणेशाही आणि पैशांच्या राजकारणाला मिळालेली चपराक असल्याचे बोलले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!