मँचेस्टर: अँडरसन-तेंडुलकर करंडक क्रिकेट स्पर्धेत १-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला आजपासून मँचेस्टरमध्ये ‘करो या मरो’ सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे, कारण जर हा सामना हरले तर मालिकाही हाताबाहेर जाणार आहे. इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मँचेस्टरमधील हवामान कसे आहे?
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सध्या ढग दाटून आले आहेत, म्हणजेच ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सुमारे ६५ टक्के पावसाची शक्यता आहे. अशा तऱ्हेने नाणेफेकीचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढते. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि त्यानंतर सुमारे एक तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करेल, जेणेकरून खेळपट्टीतील ओलाव्याचा फायदा घेता येईल.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्से, जोफ्रा आर्चर.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, लोकेश राहुल, सई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.


