Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

WI vs SCO T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक! 5 चेंडूत 4 फलंदाज तंबूत; रोमारियो शेफर्डसमोर स्कॉटलंडची दाणादाण

WI vs SCO T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक! 5 चेंडूत 4 फलंदाज तंबूत; रोमारियो शेफर्डसमोर स्कॉटलंडची दाणादाण

West Indies vs Scotland T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026चा थरार आज 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत 3 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली.

कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावत 182 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर स्कॉटलंडने झुंजार लढत दिली, मात्र संघाला 147 धावांपर्यंतच मजल मारता आली.

शिमरॉन हेटमायरची वादळी खेळी

नाणेफेक जिंकून स्कॉटलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध पण आत्मविश्वासपूर्ण सुरुवात करत एकही विकेट न गमावता 54 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर शाय होप (19) बाद झाला. अवघ्या 4 धावांतच ब्रँडन किंगही 30 चेंडूत 35 धावा करून माघारी परतला. हेटमायरने अवघ्या 36 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि तब्बल 6 षटकार ठोकत स्कॉटलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली. त्याला रोवमन पॉवेल (24) आणि शरफेन रदरफोर्ड (26) यांची चांगली साथ मिळाली आणि वेस्ट इंडिजने 482 धावांपर्यंत मजल मारली.

स्कॉटलंड कर्णधाराची एकाकी झुंज

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 7 धावांवर संघाने मायकेल जोन्स (1) याची विकेट गमावली. ब्रँडन मॅकमुलेन (14) आणि जॉर्ज मन्सी (19) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 धावांची भागीदारी पाचव्या षटकात तुटली. संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार रिची बेरिंग्टनने खांद्यावर घेतली. त्याने 24 चेंडूमध्ये 42 धावांची आक्रमक खेळी करत सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. टॉम ब्रूससोबत चौथ्या विकेटसाठी 78 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली. मात्र बेरिंग्टन बाद होताच स्कॉटलंडचा डाव पुन्हा कोलमडला.

रोमारियो शेफर्डची हॅट्ट्रिक

15व्या षटकात टॉम ब्रूस (35) बाद झाल्यानंतर रोमारियो शेफर्डने कहर केला. 17व्या षटकात त्याने सलग तीन चेंडूवर क्रॉस (11), लीस्क (0), डेव्हिडसन (0) यांना बाद करत शानदार हॅट्ट्रिक साकारली. शेफर्डने 3 षटकांत अवघ्या 20 धावा देत 5 विकेट घेतले. अखेर स्कॉटलंडचा संघ 147 धावांवर आटोपला आणि वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिला विजय दिमाखात नोंदवला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!