Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IND vs AUS : पावसाने केला गेम! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना अखेर रद्द; आता दुसरा सामना कधी?

IND vs AUS : पावसाने केला गेम! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना अखेर रद्द; आता दुसरा सामना कधी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात भारताने 9.4 ओव्हरच बॅटिंग केली, पण त्यातही दोनवेळा पावसाने व्यत्यय आणला. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर अंपायर आणि मॅच रेफ्रीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 9.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 97 रन केले. सूर्यकुमार यादवने 24 बॉलमध्ये नाबाद 39 आणि शुभमन गिलने 20 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले. अभिषेक शर्मा 14 बॉलमध्ये 19 रन करून आऊट झाला.

आशिया कप विजयानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. या सामन्यात भारतीय टीम दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरसह दोन ऑलराऊंडरना घेऊन खेळत होती. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांच्यावर होती, तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन स्पेशलिस्ट स्पिनर होते. याशिवाय अक्षर पटेल आणि शिवम दुबे या ऑलराऊंडरनाही बॉलिंग करावी लागली असती.

दुसरा टी-20 सामना कधी?

आता शुक्रवार 31 ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टारवर पहायला मिळेल. त्याशिवाय, टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना पाहता येईल.

दुसऱ्या टी-20 साठी भारतीय टीम

सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्सर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!