Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला पाठवलेला शेवटचा मेसेज काय होता? धक्कादायक सत्य आलं समोर

डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला पाठवलेला शेवटचा मेसेज काय होता? धक्कादायक सत्य आलं समोर

Phaltan Doctor Death: फलटणमधील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरात चर्चा रंगली असून पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि घरमालक प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत आता एक धक्कादायक तपशील समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लटकवलेल्या ओढणीचा फोटो प्रशांत बनकरला पाठवला होता. डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात आधीपासून ओळख होती. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर प्रशांतने डॉक्टर तरुणीला टाळण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये अनेक फोन कॉल्स आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजची देवाणघेवाण झाल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने पाठवलेला तो शेवटचा फोटो म्हणजेच ओढणीचा सेल्फी, तपासाचा सर्वात महत्वाचा पुरावा ठरू शकतो.

हेही वाचा – Phaltan Crime: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, आत्महत्येच्या काही वेळ आधी डॉक्टर तरुणीने आरोपीला शेवटचा मेसेज पाठवला होता, परंतु त्यावेळी बनकरचा फोन बंद होता. त्या मेसेजमध्ये काय होते, हे सध्या तपासाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुढे सांगितले की, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो नीट न आल्याने डॉक्टर नाराज झाल्या आणि घर सोडून बाहेर पडल्या. त्यानंतर बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढत परत आणले होते. तरीही त्या एका हॉटेल राहण्यासाठी गेल्या.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर हॉटेलच्या खोली क्रमांक ११४ मध्ये एकट्याच जाताना दिसत आहेत. त्या रात्री त्या स्वतःच रुममध्ये गेल्या आणि त्यानंतर काय घडलं, याचं गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांकडून फुटेज, मोबाईल डेटा आणि चॅट्सच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील नव्या खुलाशांनंतर संपूर्ण घटनेभोवतीचे रहस्य अधिकच गडद झाले असून, तपास यंत्रणेसमोर आता आरोपींच्या नातेसंबंधांपासून आत्महत्येच्या खऱ्या कारणापर्यंत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!