Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Women Maharashtra Kesari 2026: कोल्हापूरच्या लेकीचा सोलापुरात डंका! अमृता पुजारी ठरली ‘महिला महाराष्ट्र केसरी 2026’

Women Maharashtra Kesari 2026: कोल्हापूरच्या लेकीचा सोलापुरात डंका! अमृता पुजारी ठरली ‘महिला महाराष्ट्र केसरी 2026’

Women Maharashtra kesari 2026 : मातीतील कुस्तीचा थरार आणि महिला कुस्तीपटूंचा कस लागलेल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी २०२६’ या प्रतिष्ठित किताबावर कोल्हापूरच्या अमृता पुजारीने आपले नाव कोरले आहे. सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर पार पडलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत अमृताने प्रतिस्पर्धी वेदिका सासनेचा ७-० अशा गुणाधिक्याने पराभव करत मानाची चांदीची गदा पटकावली.

मैदानात अमृताचा दबदबा; वेदिकाची झुंज अपयशी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. कुस्तीच्या सुरुवातीपासूनच अमृताने आक्रमक पवित्रा घेत वेदिकावर वर्चस्व राखले. पहिल्या दीड मिनिटातच २ गुण घेत अमृताने आघाडी घेतली आणि सत्राच्या अखेरीस ५-० असा स्कोअर केला. दुसऱ्या सत्रात वेदिकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र अमृताने संयमी बचाव आणि चपळ हालचालींच्या जोरावर आणखी २ गुण मिळवले. अखेरच्या दोन मिनिटांत भक्कम ‘डिफेन्स’ करत अमृताने ७-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत मैदान मारले.

विजेतीला ‘सोनेट कार’ तर उपविजेतीला ‘बुलेट’
विजेत्या अमृता पुजारीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा, स्मृतिचिन्ह, ५१ हजार रुपये रोख आणि किआ सोनेट (Kia Sonet) कारची चावी प्रदान करण्यात आली. उपविजेत्या ठरलेल्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि बुलेट देऊन गौरविण्यात आले. विजयानंतर अमृताचे प्रशिक्षक दादासो लवटे आणि समर्थकांनी हलगीच्या कडकडाटात तिची विजयी मिरवणूक काढली.

महिला कुस्तीसाठी ५० लाखांच्या निधीचा प्रस्ताव – जयकुमार गोरे
यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, “पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी सरकार एक कोटींचा निधी देते, मात्र महिला कुस्तीसाठी अद्याप स्वतंत्र तरतूद नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधी द्यावा, असा अधिकृत प्रस्ताव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहे.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!