Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MCA President: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड- नवीन शेट्टी यांच्यात सामना

MCA President: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड- नवीन शेट्टी यांच्यात सामना

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी भरपूर अर्ज दाखल झाले होते. त्या सर्वांनी अखेर उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला. अजिंक्य नाईक पुन्हा एकदा अध्यक्ष बनले आहेत. जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख, डायना एडलजी, विहंग सरनाईक आणि सूरज सामंत यांनी अर्ज भरला होता. मात्र, या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.

अजिंक्य नाईक पुन्हा अध्यक्ष

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी असताना अमोल काळे यांचं निधन झाल्यानं अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. अजिंक्य नाईक आता पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. अजिंक्य नाईक 23 जुलै 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. नाईक यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यावेळी अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

अजिंक्य नाईक यांचं शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालं. त्यांनी पदवीचं शिक्षण रुपारेल कॉलेजमधून घेतलं. तर, मुंबई विद्यापीठातून एमबीए पूर्ण केलं.

अजिंक्य नाईक याची मंबई क्रिकेट असोसिएशनमधील कारकीर्द

2019 -2022 काळात ते कार्यकारिणी सदस्य होते. 2022- 2024 काळात ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते. 2024- 2025 मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष झाले आहेत.

उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड– नवीन शेट्टी यांच्यात सामना

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी डायना एडलजी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, नवीन शेट्टी, प्रसाद लाड, राजदीपकुमार गुप्ता, शहाआलम शेख, सूरज सामंत, विहंग सरनाईक यांनी अर्ज केले होते. त्यापैकी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांनी अर्ज कायम ठेवले. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांच्यात लढत होईल. अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतला. शाह आलम शेख यांनी सेक्रेटरी पदाचा अर्ज ठेवला आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज अजिंक्य नाईक यांना भरता येणार नाही असं त्यांच म्हणणं होतं.

अजिंक्य नाईक बिनविरोध, चार जागांसाठी निवडणूक

1) अध्यक्षअजिंक्य नाईकबिनविरोध

2) उपाध्यक्षजितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी

3) सचिव- शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर

4) सहसचिव – गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले

5) खजिनदारअर्मान मलिक- सुरेंद्र शेवाळ

एमसीए हे एक कुटुंब: अजिंक्य नाईक

अजिंक्य नाईक यांनी अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळाली असं सांगितलं. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.MCA हे एक कुटुंब आहे. भांडण होतं असतात निवडणुका होतं असतात आम्ही सर्व मिळून काम करू असं अजिंक्य नाईक म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वानखेडे स्टेडियम बाबत सुतोवाच केले होते. त्यानुसार नक्कीच आम्ही करू असं अजिंक्य नाईक म्हणाले.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रसाद लाडला ग्लॅमरची गरज नाही. तो जिथ उभा राहतो तिथ ग्लॅमर निर्माण होते, असं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार आणि शरद पवार यांनी मिळून एक यादी ठरवली होती त्यानुसार आम्हाला होईल असं वाटल होतं. बघूया पुढे काय होतेय, असंही लाड म्हणाले.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वांच्यासोबत राहायच असतं, असं म्हटलं. मी सर्व पदांसाठी अर्ज भरले होते. वरिष्ठांनी अर्ज माघारी घेण्यास सांगितले. त्यानुसार निर्णय घेतला. एकदम पुढे जायचं नसतं. हळूहळू जायच असतं. आता आमदार झालो आहे. बघूया पुढे काय करता येईल, अस नार्वेकर म्हणाले.

न्यायालयानं निर्णय राखून ठेवला

मुंबई क्रिकेट एसोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. शहर दिवाणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शाह आलम शेख यांनी अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं होतं. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नसल्याचा दावा शहा आलम शेख यांचा होता. सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळात एकच असल्याने कोणत्याही नियमांच उल्लंघन झालं नसल्याचं अजिंक्य नाईक यांनी म्हटलं होतं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!