Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Women’s World Cup 2025 Final: पावसामुळे खोळंबा! आयसीसी महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमधील सामना रखडला

Women’s World Cup 2025 Final: पावसामुळे खोळंबा! आयसीसी महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमधील सामना रखडला

India vs South Africa Women’s World Cup 2025 Live Scorecard Updates: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत भिडणार आहेत. दोन्ही संघांना एकदाही जेतेपदाची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल, त्या संघाकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

पाऊसाने सामन्यात व्यत्यत

मुंबईत पाऊस सुरू असल्याने सामना थांबला असून लवकरच सामन्याला सुरूवात होऊ शकते. पाऊस थांबल्यास कव्हर्स काढले जातील. टॉस अजूनही झालेला नाही.

सामना किती वाजता सुरू होऊ शकतो?

सामना टॉसनंतर होणार आहे. पाऊस थांबल्यास टॉस होईल. आधी सामना 3 वाजता होणार होता. मात्र, आता 3.30 वाजले तरीही सामना सुरू झालेला नाही. सामना सुरू होण्यास आणखी उशीर होऊ शकतो.

फायनल रद्द झाल्यास विजेता कसा मिळणार?

जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. पण दोन्ही संघांसाठी ही बातमी चांगली नसणार आहे, कारण दोन्ही संघांपैकी कधीही महिला एकदिवसीय विश्वचषकाचं जेतेपद पटकावलेलं नाही. दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर भारताने यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा पराभव स्वीकारावा लागला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!