Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोहिम विजेतेपदाची: ‘फिन’टास्टिक

मोहिम विजेतेपदाची: ‘फिन’टास्टिक

ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडने गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाचा अगदीच एकतर्फी सामन्यात पराभव केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत खरे तर इतका एकतर्फी निकाल अपेक्षित नव्हता. पण, न्यूझीलंडने तो करुन दाखवला. त्यांच्या या विजयाला फॅन्टास्टिक म्हणण्यापेक्षा ‘फिन’टास्टिक म्हणणे अधिक उचित ठरले. कारण अॅलन फिन या आक्रमक फलंदाजांने खरंच एकाहाती हा विजय मिळविला. त्याला टिम सेफर्टने उत्तम साथ केली. यापूर्वी न्यूझीलंड संघाची ओळख करुन देताना या दोघांचा आवर्जुन उल्लेख केला होता. उपांत्य फेरीच नाही, तर स्पर्धेतील बहुतेक सामन्यात या जोडीचे योगदान मोलाचे ठरले आहे. एखाद दुसरी खेळी अपवाद असेलही. पण, आजच्या खेळीनंतर त्यांना यापूर्वीच्या सगळ्या चुका माफ.
यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीकडून झालेली ही दुसरी शतकी आणि विक्रमी भागीदारी. यापूर्वी साखळी सामन्यात या जोडीने संयुक्त अरब अमिरातीचे १७३ धावांचे आव्हान १७५ धावांची नबाद भागीदारी करुन ९२ चेंडूंत सामना संपवला होता. न्यूझीलंडने दहा गडी राखून तो सामना जिंकला आणि आज याच जोडीच्या कामगिरीने नऊ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळेच न्यूझीलंडच्या कामगिरीला फॅन्टास्टिक म्हणण्यापेक्षा फिन’टास्टिक म्हणणेच योग्य आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात टिम सेफर्ट आणि फिन अॅलन यांनी स्वतःची ओळख केव्हाच निर्माण केली आहे. मात्र, त्यांच्या खेळात सातत्याचा अभाव होता. त्यापेक्षा ते आपल्यातील गुणवत्तेला न्याय देऊ शकत नव्हते. हा न्याय त्यांनी या स्पर्धेत दिला आहे. आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत सातवेळा अंतिम फेरी गाठली आहे. ही त्यांची आठवी वेळ आहे. यात सहा एकदिवसीय स्पर्धांचा समावेश आहे. टी २० स्पर्धेत त्यांना दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. पण, विजेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली नाही. टी २० विश्वचषक स्पर्धेत २०२१ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

न्यूझीलंडच्या विजयात सेफर्ट आणि अॅलन यांच्या फलंदाजीचा वाटा मोठा आहे यात शंकाच नाही. पण, तेवढाच वाटा त्यांच्या गोलंदाजांचा आहे हे विसरुन चालणार नाही. कर्णधार फिरकी गोलंदाज मिशेल सॅंटनेर याने स्वतःवर विश्वास न ठेवता दुसऱ्या षटकात नवा चेंडू दुसराच सामना खेळणारा कोल मॅकोंचीच्या हाती सोपवला. त्यानेही कर्णधाराचा विश्वास खोटा ठरु दिला नाही. पहिल्याच षटकांत त्याने नऊ धावा दिल्या. पण, क्वींटॉन डी कॉक आणि रायन रिकल्टन हे दोन मोहरे लागोपाठच्या चेंडूवर गारद केले. दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास इथेच ढासळला. अर्थात, तो उंचावण्यासाठी खेळपट्टीवर कर्णधार एडन मार्करम उपस्थित होता. समोरुन डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स हे गुणी फलंदाज आणि शेवटी मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश हे अष्टपैलू खेळाडू रांगेत होते. ब्रेविस, मार्करम जोडीने वेग मिळवायला सुरुवात केली होती. त्यांना संधी दिसत होती. मार्ग आखायला सुरुवात केली होती. त्या मार्गावरुन त्यांना पुढे जायचे होते.

अशा मार्गांवर स्पीड ब्रेकरही असतात हे त्यांच्या ध्यानी आले नाही. यंदा स्पर्धेत उपखंडातील मंद खेळपट्टीचा सुरेख वापर करुन फिरकीचा प्रभाव पाडणारा रचिन रविंद्र नावाचा स्पीड ब्रेकर या जोडीच्या आणि नंतर अन्य फलंदाजांच्या मार्गात आला. एडन मार्करम, डेव्हिड मिलर हे निष्णात फलंदाज त्याने गारद केले. कर्णधार मिशेल सॅंटनेरने देखिल आपली षटके योग्य टाकली. टी २० क्रिकेट मध्ये सुरुवातीच्या सहा षटकांनंतर अखेरच्या तीन षटकांना महत्व दिले जाते. या नऊ षटकांत प्रेक्षकांचे मनोरंजन होते. पण, संघाच्या प्रवासात महत्वाची असतात ती मधली षटके. ही मधली षटकेच दक्षिण आफ्रिकेसाठी घातक ठरली. या मालिकेत बहुतेक वेळा मी मधल्या षटकांचा उल्लेख केला आहे. मधल्या षटकांचे महत्व या सामन्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या षटकांत दक्षिण आफ्रिकेला डावाला वेग देणे जमलेच नाही. रचिन रविंद्र, मिशेल सॅंटनेर यांच्याबरोबरीने लॉकी फर्ग्युसन हा वेगवान गोलंदाज त्यांच्या वाटेत आडवा आला. त्याच्या अखेरच्या षटकांत जरुर २२ धावा निघाल्या असतील. पण, त्यापूर्वी मधल्या षटकांत जबाबदारीने गोलंदाजी करताना त्याने तीन षटकांत केवळ सात धावा दिल्या होत्या. मॅट हेन्री, जीमी निशाम या वेगवान गोलंदाजांनी देखिल आपली जबाबदारी या षटकांत चोख पार पाडली. या प्रवासात सॅंटनेरने पहिल्याच षटकांत दोन गडी बाद करणाऱ्या मॅकोंचीला पुन्हा षटक दिले नाही. त्याला आणखी एक षटक मिळाले असते, कदाचित दक्षिण आफ्रिकेचा डाव आणखी अडचणीत येऊ शकला असता. सॅंटनेरचे हे नियोजन समजू शकले नाही.

आव्हानाचा पाठलाग करताना सेफर्ट, अॅलन जोडीने या मधल्या षटकांची वेळ येऊच दिली नाही. लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, मार्को यान्सेन. केशव महाराज या रथी महाराथी असलेल्या गोलंदाजांना त्यांनी विचार करण्याची उसंतच दिली नाही. या जोडीचा झंझावात इतका वेगवान होता की आव्हानाचा पाठलाग सुरु झाल्यावर तो थेट संपल्यावरच समजला. न्यूझीलंडच्या अशा एकापेक्षा एक सरस कामगिरीला आतापर्यंत विजेतेपदाची झालर लाभलेली नाही. याची त्यांना प्रतिक्षा आहे आणि या वेळी मोठी संधी आहे. बघूयात ८ मार्चला काय होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
अष्टपैलू

अष्टपैलू

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!