Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vinesh Phogat Comeback: विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार! निवृत्तीचा निर्णय मागे घेतला

Vinesh Phogat Comeback: विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार! निवृत्तीचा निर्णय मागे घेतला

Vinesh Phogat Comeback: भारताची अनुभवी आणि स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट पुन्हा एकदा मॅटवर उतरण्यास सज्ज झाली आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मधील धक्कादायक अपात्रतेनंतर भावनिक क्षणी तिने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, काही महिन्यांच्या शांततेनंतर तिने पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला असून तिचे पुढील लक्ष्य थेट लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 आहे. पॅरिस 2024 मध्ये विनेश 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. पण स्पर्धेच्या आधी वजन 100 ग्रॅमने जास्त असल्यामुळे तिला नियमांनुसार बाहेर पडावे लागले. तीन वेळा ऑलिंपिक खेळूनही पदकाची संधी निसटल्याने ती भावनिक झाली आणि याच पार्श्वभूमीवर तिने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

‘मी परत येत आहे’; सोशल मीडियावर विनेशची घोषणा

एक्सवर पोस्ट करत तिने लिहिले की, तिला स्वतःपासून, संघर्षातून आणि मानसिक दडपणातून दूर जाण्याची गरज होती. तिने म्हटलं आहे की, ‘बराच काळ मला स्वतःलाही माहित नव्हते की पॅरिस माझा शेवट होता का. पहिल्यांदाच मी स्वतःला विश्रांती द्यायला शिकले. पण माझी कुस्तीची आवड कधीच संपली नाही.’ विनेशने पुढे लिहिले, आता मी नव्या ऊर्जेने, निर्भय मनाने LA28 कडे जात आहे. आणि यावेळी मी एकटी नाही… माझा मुलगाही या प्रवासात माझ्यासोबत असेल. तो माझा छोटा चीअरलीडर आहे.

अपात्रता, अपील आणि संघर्ष

अपात्रतेनंतर विनेशने लवाद न्यायालयात अपील केले होते. चौकशी समिती स्थापन झाली, पण सुनावणी वारंवार पुढे ढकलली गेली आणि अखेर तिचे अपील फेटाळले गेले. या घटनेने तिच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!