नवी दिल्ली : सध्या अनेक विद्युत उपकरणे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात थंडीच्या दिवसात रुम हिटरचा वापर वाढतो. ही गरज लक्षात घेता अनेक बेस्ट असे हीटर आणले जात आहेत. रुममध्ये हीटर आता एसीसारखं भिंतीवर लावता येऊ शकणार आहे.
हीटरमध्ये वेलथर्म हा ब्रँड पुढे येत आहे. या हीटरची किंमत ७१४९ असून, हा हीटर २००० वॅट्सपर्यंत पॉवरचा आहे. याच्या समोरील बाजूस जाड काच वापरली गेली आहे. वॉर्मेक्स देखील असाच एक हीटर बनवते, जो तुम्ही Amazon वरून 8499 मध्ये खरेदी करू शकता. तो एअर कंडिशनरसारखा दिसतो आणि कंपनीचा दावा आहे की तो घरातील वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे. वॉर्मेक्सचे आणखी एक उत्पादन या श्रेणीत येते, ज्याची किंमत 5224 आहे.
काही पर्याय कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. असाच एक पर्याय म्हणजे ड्रमस्टोन हीटर, जो 1500W पॉवर सप्लायसह येतो. त्याची किंमत 3569 आहे. त्यात एक डिस्प्ले देखील आहे जो सर्व माहिती देतो. एन्सी एंटरप्रायझेस नावाची कंपनी देखील असेच उत्पादन बनवते. कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 4899 मध्ये लिस्टेड आहे.


