पुणे : नोकरीबाबत तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे येथे व्हिजिटिंग फॅकल्टी (केवळ तासांच्या आधारावर) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही समोर आली आहे. तर ३ जानेवारीला ही मुलाखत द्यावी लागणार आहे. सदर मुलाखत ही प्रिन्सिपल केबिन, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, ४१२-सी, शिवाजीनगर – पुणे – ४११ ०१६.
यामध्ये आता मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे. त्यामुळे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.msihmctpune.org.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


