Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Airtel चे रिचार्ज प्लॅन झाले महाग; ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या किमती…

Airtel चे रिचार्ज प्लॅन झाले महाग; ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या किमती…

नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या सेवा देत आहेत. त्यात भारती एअरटेलने प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. पूर्वी ४००० किंमत होती, आता ती वाढवून ४९९९ केली आहे. हा एक आंतरराष्ट्रीय पॅक आहे. नवीन किंमत अधिकृत पोर्टलवर लिस्टेड आहे. ही माहिती टेलिकॉमटॉक वेबसाईटवरून मिळवण्यात आली आहे.

२०२६ मध्ये ही पहिलीच दरवाढ आहे. कंपनीने ४९९९ रिचार्ज प्लॅनची ​​किंमत अंदाजे २५% ने वाढवली आहे. एअरटेलने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ४००० रिचार्ज प्लॅन लाँच केला होता, जो असंख्य फायदे देतो. हा प्रीपेड इंटरनॅशनल रोमिंग पॅक आहे. हे रिचार्ज परदेशात जास्त काळ घालवणाऱ्या युजरसाठी उपयुक्त आहे. देशात असताना, त्यांना अजूनही अमर्यादित कॉलिंग आणि १.५GB डेली डेटा असे अनेक फायदे मिळतात.

एअरटेलचा ४९९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता ३६५ दिवसांची असणार आहे आणि त्यात आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये १०० मिनिटे आउटगोइंग आणि इनकमिंग कॉल्सचा समावेश असणार आहे. एअरटेलच्या या रिचार्जमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये परदेशात ५GB डेटा आणि १०० आउटगोइंग SMS मिळत आहेत.

रोमिंगसह अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये भारतात असंख्य फायदे मिळतात. त्यात रोमिंगसह अमर्यादित कॉलिंगचा समावेश आहे. भारतीय हद्दीत असताना, या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १.५GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा आणि दररोज १०० SMS मेसेज मिळतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!