पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर येथे संशोधन सहयोगी (आरए) आणि कृषी सहाय्यक / क्षेत्र सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहिल्यानगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी प्रमुख, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. ए. एस. कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जिल्हा: अहमदनगर-४१३ ७२२ (महाराष्ट्र) येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संशोधन सहयोगी (आरए) आणि कृषी सहाय्यक / क्षेत्र सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 16,000/- ते रु. 54,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन / ऑनलाइन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ फेब्रुवारी २०२६
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमुख, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. ए.एस. कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जिल्हा: अहमदनगर-४१३ ७२२ (महाराष्ट्र).
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : headswcerahuri@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mpkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


