नवी दिल्ली : भारतीय बाजारात Akai ने आपले नवीन उत्पादन लाँच केले आहे. कंपनीने फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन रेंज लाँच केली आहे. ब्रँडची नवीन लाईनअप डीप क्लीन तंत्रज्ञान, बिल्ट-इन हीटर आणि इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह शक्तिशाली फीचर्सही मिळत आहे.
कंपनीने विविध क्षमतांमध्ये वॉशिंग मशीन लाँच केल्या आहेत. नवीन उत्पादने अँटी-बॅक्टेरियल ड्रम कोट आणि मल्टीपल वॉश प्रोग्राम देतात. अकाईचे नवीन टॉप-लोड वॉशिंग मशीन अनेक क्षमतेच्या पर्यायांमध्ये येते. कंपनीने ते ७.५ किलो, ८ किलो, ९ किलो, १० किलो आणि १२ किलो क्षमतेच्या पर्यायांमध्ये लाँच केले आहे. याचा अर्थ ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये लहान ते मोठ्या कुटुंबांपर्यंत सर्वांसाठी वॉशिंग मशीन पर्याय आहे.
हे वॉशिंग मशीन मिड ब्लॅक आणि इनॉक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी तिच्या उत्पादनांवर १० वर्षांची वॉरंटी देते. अकाईच्या टॉप-लोड वॉशिंग मशीनच्या किंमती १४४९० पासून सुरू होतात आणि २९९०० पर्यंत जातात. तुम्ही ही उत्पादने कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल पार्टनर्सकडून खरेदी करू शकता.
मशिनमध्ये काय आहे खास?
अकाईचे नवीन वॉशिंग मशीन ७.५ किलो ते १२ किलो पर्यंतच्या अनेक क्षमतेच्या पर्यायांमध्ये येते. त्यात अँटीबॅक्टेरियल ड्रम कोटिंग आहे. चांगल्या स्वच्छतेसाठी, वॉशिंग मशीनमध्ये अनेक वॉश प्रोग्राम आहेत, जे फॅब्रिकनुसार कस्टमाइज केले जाऊ शकतात.


