Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Good News ! बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

Good News ! बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ६०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 ही असणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस).
– एकूण रिक्त पदे : एकूण ६०० रिक्त पदे (महाराष्ट्र राज्यात २६१ पदे)

– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 12300/-.

– वयोमर्यादा : २० वर्षे ते २८ वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

– अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. १५०/- + जीएसटी, एससी/एसटी: रु. १००/- + जीएसटी, पीडब्ल्यूबीडी: कोणतेही शुल्क नाही.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 जानेवारी 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2026.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bankofmaharashtra.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!