Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हीदेखील Google Chrome वापरताय? तर काळजी घ्या; सरकारने दिला युजर्सना इशारा…

तुम्हीदेखील Google Chrome वापरताय? तर काळजी घ्या; सरकारने दिला युजर्सना इशारा…

नवी दिल्ली : सध्या अनेक वेब ब्राऊजर आहेत. त्यात जर तुम्ही गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने क्रोम युजर्ससाठी हाय लेव्हल सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. सरकारनेच अशाप्रकारे अलर्ट जारी केल्याने युजर्सही आता सतर्क झाले आहेत.

CERT-In ने ३ ऑक्टोबरच्या त्यांच्या सुरक्षा बुलेटिनमध्ये म्हटले की, गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्या विंडोज, मॅकओएस आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमच्या युजर्सना प्रभावित करू शकतात. या त्रुटीचा फायदा घेऊन, रिमोट अटॅकर्स युजर्सच्या सिस्टिमवर कोड कार्यान्वित करू शकतो आणि सिस्टिमवर नियंत्रण मिळवू शकतो. CERT-In नुसार, क्रोमच्या जुने व्हर्जन असलेल्या युजर्संना सर्वात जास्त धोका असतो. हे सर्व व्हर्जन तातडीने अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, व्हर्जन तातडीने अपडेट करण्यासाठी क्रोमच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर क्लिक करा. सेटिंग्ज – क्रोमबद्दल – क्रोम अपडेट करा वर जा. अपडेट पूर्ण झाल्यानंतर ब्राउझर रीस्टार्ट करा. या अपडेटसह, गुगलने सुरक्षा सुधारणा लागू केल्या आहेत. ज्यामुळे तुमची सिस्टिम अधिक सुरक्षित होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!