नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये येत आहेत. त्यात टेक्नॉलॉजीतही बदल होताना दिसत आहे. आत्तापर्यंत अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या. त्यापैकी एक म्हणजे ब्लॅकबेरीचे फोन्स. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी फोन्स चांगलेच प्रसिद्ध होते. मात्र, कालांतराने यात घट होत होती. अखेर हा फोन बंद करण्याची वेळ कंपनीवर आली. अशीच परिस्थिती सध्या आणखी एका कंपनीवर आली आहे.
दुसऱ्या ब्रँडने स्मार्टफोन बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी कंपन्यांकडून सतत होणाऱ्या स्पर्धेमुळे आणि बदलत्या बाजारपेठेतील गतिमानतेमुळे Asus ने आपला स्मार्टफोन व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी LG नेही स्मार्टफोन बाजारातून माघार घेतली होती. मात्र, LG ची परिस्थिती Asus सारखी भयानक नाही. कंपनी लॅपटॉप आणि इतर व्यवसायांमध्ये राहील. मात्र, स्मार्टफोन बाजारातून माघार घेत आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ती २०२६ मध्ये कोणतेही नवीन फोन लाँच करणार नाही. Asus चे बाजारातून बाहेर पडणे ब्लॅकबेरीसारखेच आहे, कारण दोन्ही कंपन्यांकडे वेगवेगळे बाजार होते आणि त्यांच्या फोनसाठी एक मजबूत फॉलोअर्स होते.
ब्रँड कोणतेही नवीन फोन लाँच करणार नाही. गेल्या वर्षी, ब्रँडने दोन फोन लाँच केले होते. ROG फोन ९ FE आणि झेनफोन १२ अल्ट्रा हे ते फोन होते. मात्र, कंपनीने भारतात झेनफोन फोन लाँच करणे खूप पूर्वीच थांबवले.


