Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Mayor : मुंबईचा महापौर कुणाचा? भाजप-शिंदे गटात ‘सत्तेचा फॉर्म्युला’ ठरला; आरक्षणाच्या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष

BMC Mayor : मुंबईचा महापौर कुणाचा? भाजप-शिंदे गटात ‘सत्तेचा फॉर्म्युला’ ठरला; आरक्षणाच्या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष

BMC Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या हाती घेण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार? आज (२२ जानेवारी) महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढली जाणार असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने सत्तेच्या समीकरणांना वेग येणार आहे.

सत्तेचे वाटप: कोणाला काय मिळणार?

प्राप्त माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गट यांच्यात पदांच्या वाटणीबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून एक संभाव्य ‘फॉर्म्युला’ समोर आला आहे. मुंबईचा महापौर भाजपचा झाल्यास, शिंदे गटाला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. सुधार समिती, बेस्ट (BEST) आणि आरोग्य समिती यांसारख्या महत्त्वाच्या समित्या भाजप आपल्याकडे ठेवू शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शिक्षण आणि सुधार समितीसाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, बदलत्या समीकरणात त्यांना शिक्षण, विधी, बाजार आणि उद्यान समिती मिळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये करार का? वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना दावोस दौऱ्यावरून टोला

फडणवीस आणि शिंदे यांची निर्णायक बैठक

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या चार महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच अंतिम बैठक होणार आहे. युतीमध्ये कोणताही वाद होऊ नये आणि दोन्ही पक्षांचा सन्मान राखला जावा, यासाठी भाजप सावध पावले टाकत आहे. जर महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघाले, तर महायुतीसमोर पेच निर्माण होऊ शकतो, कारण या प्रवर्गातील विजयी उमेदवार ठाकरे गटाकडे जास्त आहेत. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर नेमकी कोणती पदे कोणत्या पक्षाच्या पदरात पडणार, याचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!