नवी दिल्ली : सध्या बदलत्या युगात आपल्यापैकी अनेकजण सुरक्षेची विशेष अशी काळजी घेताना दिसून येतो. त्यात काहीना काही उपाययोजना केल्या जातात. असे असताना अगदी सहज वापरला जाणारा पर्याय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा. सुरक्षेच्या कारणास्तव याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. मात्र, अनेकजण हे कॅमेरे महाग असल्याने लावण्यात कचरतात. पण आता हे कॅमेरे अगदी बजेटमध्ये उपलब्ध झाले आहेत.
स्वस्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे खूप सोपे आहे आणि तुम्ही ते स्वतः बसवू शकता. हे कॅमेरे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा एंट्रन्सला ठेवता येतात. तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तसेच बाजारपेठेतून घरासाठी चांगले आणि स्वस्त सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करू शकता. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघांमधील किंमतींची तुलना करू शकता आणि तुमच्या खरेदीसाठी सर्वोत्तम सीसीटीव्ही कॅमेरे शोधू शकता.
सध्या अमेझॉन इंडियावर स्वस्त सीपी प्लस कॅमेरा उपलब्ध आहे. सीपी प्लस २ एमपी फुल एचडी स्मार्ट वाय-फाय सीसीटीव्हीची किंमत १३९९ आहे. ते वायफायला सपोर्ट करते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराची दूरवरूनही माहिती घेऊ शकता. तसेच मॅजिक स्मार्टहोम हा ड्युअल कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. फ्लिपकार्टवर त्याची किंमत १५६४ आहे. यात दोन ५ मेगापिक्सेल कॅमेरे आहेत, प्रत्येकी वायफाय सपोर्ट आणि अॅप सपोर्टसह मिळत आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल अँटेना सेटअपही दिला गेला आहे.


